World Cup 2023: विश्वचषक सराव सामने कुठे लाइव्ह पाहू शकता? जाणून घ्या

0
WhatsApp Group

भारतात एकदिवसीय विश्वचषक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील बहुतांश संघ भारतात पोहोचले आहेत. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार असली तरी त्यापूर्वी तयारीसाठी सराव सामने खेळवले जाणार आहेत. शुक्रवारी तीन सामन्यांनी सुरुवात होईल. 29 सप्टेंबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडशी, तर श्रीलंकेचा संघ गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशशी भिडणार आहे.

त्याच दिवशी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. हे सामने टीव्ही आणि मोबाईलवर कसे पाहणार, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

विश्वचषक सराव सामन्यांचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत X हँडलवरील पोस्टनुसार, भारत-इंग्लंड सराव सामना Disney+ Hotstar वर लाइव्ह-स्ट्रीम केला जाईल. टीव्हीवर या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्या पाहू शकता.

भारताचा सामना कधी? 

29-30 सप्टेंबर आणि 2-3 ऑक्टोबर रोजी सराव सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ 2-2 सामने खेळेल. भारतीय संघ 30 सप्टेंबरला गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. तर टीम इंडियाचा दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबरला नेदरलँडशी होणार आहे. हा सामनाही गुवाहाटीमध्येच खेळवला जाईल. भारतीय संघ गुरुवारी गुवाहाटीला पोहोचला. शुक्रवारी टीम इंडिया सराव करणार आहे.

‘INSIDE MARATHI’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!