World Cup 2023: न्यूझीलंडचा सलग तिसरा विजय, बांगलादेशवर 8 विकेट्सनी केली मात

WhatsApp Group

New Zealand vs Bangladesh: आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात चुरशीचा सामना झाला. किवी संघाने हा सामना 8 गडी राखून जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघाने 42.5 षटकांत 2 गडी गमावून सामना सहज जिंकला. न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरला तो डॅरिल मिशेल, ज्याने 89 धावांची नाबाद खेळी खेळली. केन विल्यमसनने 78 धावा केल्या. न्यूझीलंडचा विश्वचषकातील हा सलग तिसरा विजय ठरला. यादरम्यान बांगलादेशकडून मुस्तफिझूर आणि कर्णधार शकीबने प्रत्येकी 1 बळी घेतला.

नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि उत्कृष्ट गोलंदाजीमुळे बांगलादेशला 50 षटकात 245/9 धावांवर रोखले. संघाकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनीही उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

या सामन्यात 246 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. सलामीला आलेला रचिन रवींद्र 9 धावा (13 चेंडू) करून मुस्तफिझूर रहमानचा बळी ठरला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या केन विल्यमसनने डेव्हॉन कॉनवेसोबत 80 (105 चेंडू) धावांची भागीदारी केली. 21 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोघांमधील ही भागीदारी तुटली, जेव्हा डेव्हॉन कॉनवे 3 चौकारांच्या मदतीने 45 (59) धावा करून शकीब अल हसनचा बळी ठरला. यानंतर न्यूझीलंडने एकही विकेट गमावली नाही.

कर्णधार केन विल्यमसनने 39 व्या षटकात 107 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 78* धावा केल्या. या सामन्यात विल्यमसन चांगलाच फॉर्ममध्ये दिसत होता. आपला चांगला खेळ करत त्याने हळूहळू सामना पुढे नेत संघाला विजयाच्या जवळ नेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

विल्यमसननंतर, ग्लेन फिलिप्स फलंदाजीला आला, त्याने 11 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारून 16* धावा जोडल्या. यादरम्यान, डॅरिल मिशेलने 67 चेंडूत 6 चौकार आणि 89* धावा केल्यानंतर नाबाद राहिला. मिशेल सुरुवातीपासूनच काहीसा आक्रमक दिसत होता. त्याने 132.84 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. शेवटी, मिशेल आणि फिलिप्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी 48* (27 चेंडू) ची नाबाद भागीदारी झाली.

बांगलादेशी गोलंदाज अपयशी ठरले
प्रथम बांगलादेशकडून खराब फलंदाजी पाहायला मिळाली, त्यानंतर संघाचे गोलंदाजही विशेष काही करू शकले नाहीत. फक्त कर्णधार शकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. यादरम्यान शकिबने 10 षटकांत 54 धावा तर मुस्तफिझूरने 8 षटकांत 36 धावा दिल्या.