World Cup 2023 : वर्ल्ड कपमधला सगळ्यात मोठा उलटफेर, आफ्रिका-नेदरलँड्स मॅचचा धक्कादायक निकाल

WhatsApp Group

Netherlands vs South Africa: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. 2023 च्या विश्वचषकात मोठी उलथापालथ होत आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करून खळबळ उडवून दिली होती. तर आता नेदरलँड्स संघाने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा पहिला विजय आहे.

टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली सुरुवात केली, परंतु त्यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही आणि ते लवकर बाद झाले. बावुमाने 16 तर डी कॉकने 20 धावा केल्या. रॉसी व्हॅन ड्यूसने 4 धावा, एडन मार्करामने 28 धावा केल्या. डेव्हिड मिलरने नक्कीच काही काळ विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, पण तो 43 धावा करून बाद झाला आणि संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. नेदरलँड्सकडून पॉल व्हॅन मीकरेन, रिलोफ मर्व्ह आणि बास डी लीडे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. संघाकडून लोगान व्हॅन विकने सर्वाधिक 3 बळी घेतले. या खेळाडूंमुळेच नेदरलँडचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.

हेही वाचा – World Cup 2023: टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आला ताप, बाबर आता काय करणार?

नेदरलँडच्या कर्णधाराने मोठी खेळी केली

नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा सलामीवीर विक्रमजीत सिंग केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मॅक्स ओ’दाऊदही 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कॉलिन अकरमनने 12, बास डी लीडेने 2 धावा केल्या. नेदरलँड्सचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकणार नाही आणि दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकण्यात सहज यशस्वी होईल असे वाटत होते, मात्र यानंतर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने क्रीजवर थांबून शानदार खेळी केली. त्याने 69 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 78 धावा केल्या. रिओल्फने 29 आणि आर्यन दत्तने 9 चेंडूत 23 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, पण नंतर त्यांनी आपली लय गमावली. यामुळे नेदरलँडच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 246 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जेसन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

हेही वाचा – राज्य सरकारची मोठी घोषणा! 1 एलपीजी सिलिंडर मिळणार मोफत

पहिला विजय नोंदवला

नेदरलँड्सने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा वनडेत पराभव केला आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 आफ्रिकन संघाने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.