न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करत विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला. चेपॉक येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 149 धावांनी विजय मिळवला. यामुळे न्यूझीलंड आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने 6 बाद 288 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 34.4 षटकांत 139 धावांवरच मर्यादित राहिला. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक 36 धावांची आणि अजमतुल्लाने 27 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून लोकी फर्ग्युसन आणि मिचेल सँटनर यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 2 बळी घेतले. याशिवाय मार्क हेन्री आणि रचिन रवींद्र यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज 6व्या षटकात 11 धावा काढून बाद झाला. यानंतर अफगाणिस्तानने 7व्या षटकात 27 धावांवर दुसरी विकेट गमावली. प्रथम मॅट हेन्रीने रहमानउल्ला गुरबाजला बोल्ड केले. यानंतर ट्रेंट बोल्टने इब्राहिम झद्रानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Rohit Sharma: विश्वचषक 2023 दरम्यान रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय
Two more points on the board in Chennai! Lockie Ferguson 3-19 and Mitch Santner 3-39 leading the bowling effort. Scorecard | https://t.co/KwEW5rcWOQ #CWC23 pic.twitter.com/VLDdZqy6rh
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 18, 2023
यानंतर 43 धावांवर अफगाणिस्तानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या रूपाने तिसरी विकेट गमावली. शाहिदी 29 चेंडूत केवळ 8 धावा करून बाद झाला. लॉकी फर्ग्युसनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर रहमत शाह आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली, मात्र त्यानंतर अजमतुल्ला उमरझाई 32 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने ओमरझाईला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रहमत शाहही 62 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. रहमत शाहला रचिन रवींद्रने बाद केले. यानंतर काही वेळातच अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 139 धावांवर आटोपला.
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली
अफगाणिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने 6 बाद 288 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. कर्णधार टॉम लॅथमने 68 आणि विल यंगने 54 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हक आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी 2-2 बळी घेतले. तर राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.