
AUS vs SA: लखनौच्या एकना स्टेडियमवर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी विजय मिळवला. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजय आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 7 बाद 311 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव 40.5 षटकांत 177 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून लॅबुशेनने सर्वाधिक 46 आणि स्टार्कने 27 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर जॉन्सन, केशव महाराज आणि शम्सी यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. तर लुंगी एनगिडीला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने 311 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श सलामीला आले. मात्र 27 धावांच्या स्कोअरवर मार्को युनसेनने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. त्याने मिचेल मार्शला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मिचेल मार्श 15 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. यानंतर लुंगी एनगिडीने डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नर १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कागिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेला तिसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्मिथ 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर दक्षिण कागिसो रबाडाने जोशला बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. तो 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर लॅबुशेनने 46 धावांची तर स्टार्कने 27 धावांची खेळी खेळली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 7 बाद 311 धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 312 धावा करायच्या आहेत. या विश्वचषकात क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी आपली दुसरी दमदार इनिंग खेळली. त्याने 106 चेंडूत 109 धावा केल्या. तर एडन मार्करामने 56 आणि कर्णधार टेंबा बावुमाने 35 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी एक यश मिळाले.