
World Blood Donor Day 2022 : जागतिक रक्तदाता दिवस 14 जून 2022 रोजी साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने हा दिवस रक्तदाता दिवस (World Blood Donor Day 2022) म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. या दिवसाला रक्तदान दिवस (Blood Donation Day) म्हणून देखील ओळखले जाते.
लोकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी 2004 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक रक्तदाता दिवसाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाशी संबंधित काही (World Blood Donor Day History) गोष्टींबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. आम्ही आज तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून रक्तदानाशी संबंधित काही रंजक माहिती सांगणार आहोत…
14 जून हा ABO रक्तगट प्रणालीचा शोध घेणारे शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म दिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. त्यांच्या या शोधापूर्वी, रक्तसंक्रमण गटाच्या माहितीशिवाय केले जात होते. कार्ल लँडस्टेनर यांनी ABO रक्त प्रणालीचा शोध लावला. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. कार्ल लँडस्टेनर यांच्या सन्मानार्थ जगभरात रक्तदाता दिवस साजरा केला जातो.