टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, सामने कधी अन् कुठे पाहता येणार? घ्या जाणून

WhatsApp Group

आयसीसी अंडर 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 आजपासून सुरू होत आहे. या विश्वचषकात 16 संघांचा सहभाग आहे. भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारत रविवार 19 जानेवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करणार. 2023 मध्ये इंग्लंडला हरवून भारत विश्वविजेता बनला होता.

सामने कुठं पाहता येणार?

सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 8.00 आणि दुपारी 12.00 वाजता सुरू होतील. अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकाचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सर्व सामने स्टार स्पोर्ट्स 2 (एचडी+एसडी) आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी+एसडी) वर पाहू शकता.

भारतीय संघ

भारत: निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चालके, जी त्रिशा, कमलिनी जी, भाविका अहिरे, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी दृथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.