आज आयसीसीने महिला T20 विश्वचषक 2024 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी बांगलादेश T20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांना ब गटात स्थान देण्यात आले आहे.
महिला T20 विश्वचषक 2024 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ढाका येथे होणार आहे. सर्व संघ आपापल्या गटात 4-4 सामने खेळणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
The Hon’ble Prime Minister of Bangladesh Sheikh Hasina with Bangladesh captain Nigar Sultana and India captain Harmanpreet Kaur at the fixtures launch of the ICC Women’s #T20WorldCup 2024 📸 pic.twitter.com/5tbCN8UFHC
— ICC (@ICC) May 5, 2024
महिला T20 विश्वचषक 2024 साठी गट
- अ गट- भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, क्वालिफायर 1.
- ब गट- बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, क्वालिफायर 2.
टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक
भारतीय महिला क्रिकेट संघ 4 ऑक्टोबर रोजी महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना 6 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर, भारतीय संघ 9 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर 1 शी स्पर्धा करेल. टीम इंडिया 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.