मानधना 3.40 कोटी, हरमन 1.8 कोटी… कोणत्या संघात कोण-कोणते खेळाडू? जाणून घ्या

WhatsApp Group

पहिल्यांदाच, मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये महिला आयपीएलसाठी 5 संघांमधील 448 खेळाडूंचा लिलाव होत आहे. 5 संघांमध्ये मुंबई, लखनौ, बंगळुरू, अहमदाबाद आणि दिल्ली या संघांचा समावेश आहे. 4 मार्चपासून सुरू होणार्‍या, 50 लाखांच्या मूळ किंमतीच्या या स्पर्धेत 24 खेळाडू आणि 40 लाखांच्या स्लॉटमध्ये 30 खेळाडू आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू आहे. स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

पहिली बोली टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिच्या नावावर आहे, तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. स्मृती साठी जवळपास सर्व संघांनी बोली लावली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तिला 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. टीम इंडियाचे खेळाडू एकत्र बसून लिलाव पाहत आहेत. फ्रँचायझी मंधानासाठी बोली लावत असताना, संघातील बाकीचे खेळाडू स्मृतीचं अभिनंदन करत आनंद साजरा करत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

स्मृती मानधना (भारत) – आरसीबीला 3.4 कोटी रुपये
अॅश गार्डनर (ऑस्ट्रेलिया) – गुजरात जायंट्सला 3.2 कोटी रुपये
हरमनप्रीत कौर (भारत) – मुंबई इंडियन्सला 1.8 कोटी रुपये
एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) – आरसीबीला 1.8 कोटी रुपये
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) – यूपी वॉरियर्सला 1.8 कोटी रुपये
सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) – आरसीबीला 50 लाख रुपये