आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD) ( womens day wishes in marathi ) हा महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक सुट्टी आहे. लिंग समानता, पुनरुत्पादक अधिकार आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधून, महिला हक्क चळवळीतील हा एक केंद्रबिंदू आहे. हा जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जागतीक महिला दिन शुभेच्छा.
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू.
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे,
ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा
विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा.
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा.