India vs Sri Lanka Asia Cup 2024 final: भारताचा पराभव करत श्रीलंकेनं कोरलं आशिया चषकावर नाव
India vs Sri Lanka : श्रीलंका महिला संघानं दमदार कामगिरी करत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारतीय संघानं श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावत 165 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा केल्या. तिनं 47 चेंडूत 60 धावांची खेळी केली. श्रीलंकेला विजयासाठी 166 धावांच आव्हान दिलं होत. श्रीलंकेच्या संघान 8 विकेट राखत हा सामना जिंकला. श्रीलंकेने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. श्रीलंकेसाठी कॅप्टन चमारी अथापथू आणि हर्षिता समरविक्रमा या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. या दोघींच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला विजय मिळवता आला. श्रीलंकेची ही आशिया कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
A packed house at Dambulla was on their feet, as Harshitha Samarawickrama and Chamari Athapaththu bring home the Asia Cup 🏆✨https://t.co/uswfdQAxEa #SLvIND #AsiaCup2024 pic.twitter.com/rPDAnAFwOa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 28, 2024
फायनलमध्ये भारताला चांगली सुरुवात करून देणाऱ्या स्मृती मंधानाने बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलमध्येही अर्धशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने शेफाली वर्माच्या साथीने चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. शेफाली बाद झाल्यानंतर भारताने एकापाठोपाठ काही विकेट्स गमावल्या. पण रिचा घोष (30) आणि जेमिमाह रॉड्रिग्स (29) यांनी अखेरपर्यंत चांगली खेळी करत भारताला 165 धावांपर्यंत नेले.
Paris Olympics 2024 : मनू भाकरनं रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली!
Asia Cup 2024 CHAMPIONS – SRI LANKA🔥#SLvsIND | #AsiaCup2024 pic.twitter.com/ep1GYm4Cn6
— Cricket.com (@weRcricket) July 28, 2024
प्रत्युत्तरात 166 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सुरुवातीला श्रीलंकेने 7 धावांवर पहिली विकेट गमावली. मात्र त्यांची दुसरी विकेट 94 धावांवर पडली. चमारी अटापट्टूने पुन्हा एकदा श्रीलंकेसाठी दमदार खेळी केली. चमारी अटापट्टूने 43 चेंडूत 61 धावा केल्या. ज्यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. हर्षिता समरविक्रमानेही अप्रतिम फलंदाजी केली. हर्षितानेही अर्धशतक झळकावलं, 51 चेंडूत 69 धावा करत संघाला विजयापर्यंत पोहोचवलं.
भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, उमा चेत्री, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.
श्रीलंकेचा महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी आणि सचिनि निसांसला.