
संबंध म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नव्हे, तर ते एक मानसिक, भावनिक आणि आत्मिक नातं असतं. पण काही वेळा संभोग करताना नकळत केलेल्या काही चुकीमुळे नात्यात तणाव निर्माण होतो. विशेषतः काही सवयी किंवा वर्तन पुरुषाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच संभोगासारख्या नाजूक क्षणी महिलांनी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.
१. सतत टीका करणे किंवा तुलना करणे
संभोगाच्या वेळी जर स्त्रीने पुरुषाच्या शरीरावर, त्याच्या क्षमतेवर किंवा पूर्वीच्या अनुभवांवर टीका केली, किंवा त्याची इतरांशी तुलना केली, तर हे पुरुषाच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम करू शकते. यामुळे पुरुष संभोगात कमी उत्साही होतो, आणि त्याचा संपूर्ण परफॉर्मन्सवर परिणाम होतो.
२. संघर्ष किंवा गैरसमज यावेळी पुढे आणणे
संभोगाच्या क्षणी कोणत्याही भांडणाची आठवण करून देणे, जुन्या गोष्टींची कुरकुर करणे हे पुरुषासाठी मानसिक तणाव निर्माण करते. अशा वेळी जोडीदाराकडून अपेक्षित असते प्रेम, जिव्हाळा आणि समर्पण, पण जर त्या ऐवजी तणाव वाढवणाऱ्या गोष्टी बोलल्या गेल्या तर संभोगाचा आनंद पूर्णपणे हरवतो.
३. निर्बंध किंवा थेट नकार
कधी कधी स्त्रिया थेट नकार देतात किंवा त्यात रस नाही असं स्पष्टपणे सांगतात, पण त्यामागे शारीरिक किंवा मानसिक कारण असलं तरी ते योग्य प्रकारे व्यक्त न केल्यास पुरुषाला नकारात्मक वाटू शकतं. हे त्याला नाकारल्यासारखं वाटतं आणि त्याच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो.
४. स्वतःच्या शरीराबद्दल अत्याधिक संकोच
स्त्रियांनी जर आपल्या शरीराबद्दल सतत नकारात्मक बोलणं – “मी जाड झाले आहे”, “माझं शरीर आकर्षक नाही”, असे संवाद संभोगाच्या वेळी टाळले पाहिजेत. हे पुरुषाच्या मूडवर आणि आकर्षणावर परिणाम करतात. त्याऐवजी आत्मविश्वास दाखवला, तर संभोग अधिक सुंदर आणि भावनिकदृष्ट्या संतुलित होतो.
५. फक्त स्वतःचा विचार करणे
संभोग म्हणजे दोघांचाही आनंद. काही स्त्रिया फक्त स्वतःचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. हे पुरुषाला उपेक्षित वाटू शकते. त्यानेही प्रेमाने वेळ दिला आहे, हे लक्षात घेऊन, संवाद आणि समर्पण असणे महत्त्वाचे आहे.
६. अचानक मन बदलणे
काही वेळा स्त्रिया संभोगास तयार असतात, पण मध्यातच मन बदलतात आणि थांबण्याचा आग्रह करतात. काही प्रसंगात हे योग्य असेलही, पण जर हे वारंवार होत असेल, तर ते पुरुषाच्या मनावर नकारात्मक परिणाम करू शकते. संवाद आणि एकमेकांची गरज समजून घेणं इथे आवश्यक असते.
संभोग म्हणजे केवळ शरीरसंबंध नव्हे, तर एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि सन्मान यांची परीक्षा आहे. स्त्रियांनी वरील चुका टाळल्यास, संभोगाचा अनुभव दोघांसाठीही समाधानकारक आणि परिपूर्ण ठरू शकतो. संवाद, समजूतदारपणा आणि जिव्हाळा या तिन्ही गोष्टीजोडीदारात असेल, तर कोणतीही अडचण टिकून राहत नाही.