पुणे – पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे हडपसर (Hadapsar) परिसरामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एक महिलेने मुलीला कुत्रा चावला होता. या रागातून त्या महिलने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारले. अनिता दिलीप खाटपे (वय 45) असं या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता दिलीप खाटपे नावाची ही महिला पुण्यातील हडपसर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहते. त्यांचे वय 45 वर्षे इतके आहे. त्यांच्या मुलीला कुत्रा चावला होता. याचा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी याच रागातून कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना इतके बदडले की त्यांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर , सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही, असं म्हणत यानंतर ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरत होती.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली असून अनिता दिलीप खाटपे (वय 45) या महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.