धक्कादायक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनकर्त्या महिलेने बाळाला दिला जन्म

WhatsApp Group

बीड – गेल्या अनेक दिवस बीड Beed Collector’s Office जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेनं आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या महिलेने बाळाला जन्म दिलाय.

मनीषा विकास काळे असं या आंदोलनकर्त्या मातेचं नाव असून त्यांचे वय 23 वर्ष आहे. ही महिला गेले अनेक दिवस घरकुलासाठी उपोषण करत आहे.

पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळताच ते रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले मात्र मनीषा यांनी सरकारचे उपचार नाकारले आहेत.