औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यामधील वैजापूर Vaijapur याठिकाणी एका शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून भावजयीस बेदम मारहाण Shivsena MLA beat sister in law केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित महिला ही आपल्या पतीसोबत एका नातेवाईकाच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी भर कार्यक्रमामध्ये त्या आमदाराने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पीडितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
या मारहाणीमध्ये आमदाराची भावजय गंभीर जखमी झाल्या आहेत. त्याच्या पाठीवर आणि शरीरावर मारहाण केल्यामुळे व्रण उमटले आहेत. तर या प्रकरणी आता आमदारासह 10 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल FIR lodged केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.रमेश बोरनारे Ramesh Bornare असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून ते शिवसेना आमदार Shivsena MLA आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर नऊ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील सटाणा याठिकाणी गुरुवारी भाजपच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. हे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आरोपी शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे या पतीसह तेथे उपस्थित होत्या.या कार्यक्रमामध्ये जयश्री यांनी डॉ. कराड आणि माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांचा सत्कार केला होता.
विरोधी पक्षातील नेत्याचा सत्कार केल्यामुळे रमेश बोरनारे कुटुंबाच्या ते जिव्हारी लागलं. याच रागातून बोरनारे कुटुंबीयांनी जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. यावेळी आरोपींनी पीडित महिलेला शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या मारहाणीमध्ये आमदार रमेश बोरनारे देखील सहभागी झाले होते, असा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला देखील मारहाण केली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी वैजापूरमधील गोदावरी कॉलनीत घडला आहे.