ठाण्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कासारवडवली येथे ठाकरे गटातील एका महिलेला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारहाण करण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या महिलेचं नाव रोशनी शिंदे असं आहे. रोशनी शिंदे या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे)युवती सेनेसाठी काम करतात. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिलांचा एक गट रोशनी शिंदे यांना घेरून वाद घालताना दिसत आहे.