‘किंग’ कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा त्याची ‘विराट’ कामगिरी

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा आज वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण क्रिकेटविश्वातून आज विराटवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

विराट कोहली हा मूळचा दिल्लीचा असून त्याचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 झाला आहे. कोहलीने 2006 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी विविध वयोगट स्तरांवर शहराच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने मलेशियामध्ये झालेला 2008 चा अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर काही महिन्यांनीच वयाच्या 19 व्या वर्षी विराटने श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी वनडे पदार्पण केले.

सुरुवातीला भारतीय संघात राखीव फलंदाज असलेल्या विराटने लवकरच वनडे संघाच्या मधल्या फळीतील एक नियमित फलंदाज म्हणून स्व:ताला सिद्ध केलं. विराट 2011 आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचाही भाग होता.

विराटची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने 96 कसोटी सामन्यांमध्ये 27 अर्धशतक आणि 27 शतकांसह 7 हजार 765 धावा केल्या आहेत. विराटने कसोटीत 7 द्विशतकी झळकावली आहेत.

विराटची वनडे क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने आजवर 254 सामने खेळले असून यात त्याने 12 हजार 169 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर वनडेत 62 अर्धशतकं आणि 43 शतकं आहेत.

विराटची टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने 92 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यात त्याने 29 अर्धशतकांसह 3 हजार 225 धावा केल्या आहेत.

विराटची आयपीएलमधील कामगिरी

विराट कोहलीने 207 आयपीएल सामने खेळले असून यात त्याने 6 हजार 283 धावा केल्या आहेत. विराटने आयपीएलमध्ये 5 शतकं आणि 42 अर्धशतकं लगावली आहे