आता किरणा दुकानात मिळणार वाईन! ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

WhatsApp Group

मुंबई – राज्यात आता किरणा दुकानात , सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक ईन स्टोअरमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते अशी शक्यता आहे Wine to be soon available in supermarkets. राज्यातील वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

महसुलात वाढ करण्यासाठी ठाकरे सरकार वाईन विक्रीचा नवीन प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावामुळे हजारो कोटी रुपयांची भर राज्याच्या महसूलात पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवा वाईन प्रस्ताव आजच्या होणाऱ्या बैठकीत मंजूर झाल्यास जनरल स्टोअर, सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक ईन स्टोअरमध्ये वाईनची विक्री करणे शक्य होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.