मुंबई – राज्यात आता किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक ईन स्टोअरमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे Wine available in supermarkets and walk-in stores in Maharashtra. राज्यातील वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी ठाकरे सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांची भर राज्याच्या महसूलात पडणार असल्याचेही सरकार म्हणत आहे.
नवा वाईन प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाल्याने जनरल स्टोअर, सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक ईन स्टोअरमधून ग्राहकांना वाईनची खेरेदी करता येणार आहे. आज दुपारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर काही लोकांनी स्वागत केले आहे तर काहींनी या निर्णयाचा निषेध केला आहे.