‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होणार? दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली…

WhatsApp Group

SAB TV चा लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या एक दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 14 वर्षांपासून सुरू असलेल्या या सिटकॉम शोचा टीआरपी नेहमीच उच्च राहिला आहे. टेलिव्हिजन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये हा शो नेहमीच प्रेक्षकांची पहिली पसंती राहिला आहे. मात्र काही काळापासून अनेक कलाकारांनी या शोमधून एक्झिट घेतली आहे. अलीकडेच शोचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही शो सोडण्याची घोषणा केली होती. एकापाठोपाठ एक अनेक कलाकारांनी या शोला निरोप दिल्यामुळे त्याचा टीआरपीवर परिणाम होत आहे. यावर आता मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा हिने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिया ही दिग्दर्शक मालव यांची पत्नीसुद्धा आहे. काही महिन्यांपूर्वी तिनेसुद्धा मालिकेला रामराम केलं होतं. त्याच्याआधी शैलेश लोढा, दिशा वकानी, भव्य गांधी, राज अनाडकत यांसारख्या कलाकारांनीही मालिकेचा निरोप घेतला. मात्र तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी होती. ‘तारक मेहता..’ ही मालिका आता आधीसारख प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही, असंही काही जण म्हणत आहेत. मालिकेतून लोकप्रिय कलाकार बाहेर पडल्याने निर्माते चिंतेत आहेत. तर आता मालिकेचा टीआरपीसुद्धा पहिल्यासारखा राहिला नसल्याचं कळतंय.

मालिकेच्या घसरत्या टीआरपीबद्दल प्रिया अहुजा म्हणाली की शोच्या क्वालिटीमध्ये कोणतीच कमतरता नाहीय. मात्र हा फक्त बघणाऱ्यांचा दृष्टीकोन आहे. “मला कधीच टीआरपीचा खेळ समजला नाही. मात्र मी मानत नाही की तारक मेहता ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे”, असं ती म्हणाली आहे.