रशिया विरुद्ध युक्रेन युद्धामुळे अनेक वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. यात गहू आणि पेट्रोल-डिझेल यांचे वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेन हा तिसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. त्यामुळे गव्हाचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या सांगलीमध्ये गव्हाचे भाव 25 ते 35 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. तसेच भारतात 80 टक्के सूर्यफूल तेल हे युक्रेननधून येते, त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सूर्यफूल तेलाच्या दरावर होणार आहे.
घरगुती गॅसच्या किमतीबाबत पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेत असतात. यावेळी या किमतींवर रशिया आणि युक्रेनमधील संकटाचाही (Russia Ukraine War) परिणाम दिसण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनच्या परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल-डिझेलसह (Petrol-Diesel Price) घरगुती गॅसच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कच्च्या तेलाच्या बाजारातील नाराजीचा परिणाम लवकरच देशांतर्गत बाजारावर दिसून येईल. पेट्रोल आणि डिझेलच्या भाव सध्या स्थिर असले तरी येत्या 10 दिवसांत दर 12 रुपयांनी वाढू शकतात. जर आपण आजच्या दराबद्दल बोललो, तर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आजही स्थिर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलाच्या किमती वाढण्याचीही शक्यता नाही. मात्र निवडणुकीचे निकाल येण्यास अवघे पाच दिवस उरले आहेत. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जगभरातील अनेक देशामध्ये गॅसच्या किमतीत वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात ऑइल-गॅस तज्ञांनुसार, भारतामध्ये पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीही वाढू शकतात. याचा परिणाम अनेक सेक्टर्सवर होण्याची शक्यता आहे.