तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच लग्न करणार? कौटुंबिक दबावामुळे घेतला हा निर्णय

0
WhatsApp Group

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हापासून या दोघांनी त्यांच्या नात्याचा मीडियामध्ये स्वीकार केला तेव्हापासून ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ‘तमन्ना आणि विजय लग्नाच्या तयारीत आहेत.’

अभिनेत्रीचे पालक दबाव टाकत आहेत
रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अभिनेत्रीचे आई-वडील विजयसोबत लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत आहेत. भोला शंकर आणि रजनीकांत स्टारर जेलर या चित्रपटातील ‘कावाला’ गाण्यात दिसल्यानंतर तमन्ना भाटियाने कोणताही नवीन चित्रपट साइन केलेला नाही, असा दावाही यात करण्यात आला आहे. लग्नामुळे ती कोणताही चित्रपट साईन करत नसल्याचे बोलले जात आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये एकत्र काम करताना दिसले होते. एका रिपोर्टनुसार, दोन्ही स्टार्स या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्याचवेळी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पहिल्यांदाच गोव्यात न्यू इयर सेलिब्रेट करताना दिसले, त्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. विजय वर्मा नुकताच करीना कपूर खान आणि जयदीप अल्लावत यांच्यासोबत ‘जाने जान’ चित्रपटात दिसला होता.