उद्धव ठाकरेंना बसणार आणखी एक धक्का; मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामील?

WhatsApp Group

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दुसऱ्या भूकंपाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चंपा सिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरसुद्धा शिंदे सामील होणार असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले अनेक नेते ज्यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका  करत होते, तेव्हा त्याचं खरं लक्ष्य मिलिंद नार्वेकर हे होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच मिलिंद नार्वेकरांची पाठराखण केली होती. पक्षात त्याचं महत्त्व प्रचंड होतं. त्यांना पक्षाचं सचिव पदही देण्यात आले होते. शिवसेनेत फुट पडली तेव्हा एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याची जबाबदारीही उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांनाच दिली होती. दरम्यान आता गुलाबराव पाटील यांच्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आता शिंदे गटात आला आहे. आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा