अभिनेत्री Kiara Advani राजकारणात? शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये? केलं मोठं विधान

WhatsApp Group

प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी Kiara Advani हिला लोकमतच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ सोहळ्यामध्ये ‘शेरशाह’ चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. यावेळी तिने मराठीमध्ये आभार व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे लोकमत समूहाचे संचालक विजय दर्डा यांनी कियाराला राजकारणात येण्याबाबत कियाराला एक प्रश्न केला.

तुला जर राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायला सांगितलं तर तू कोणत्या पक्षात जाशील?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात?, असा प्रश्न विजय दर्डा कियाराला विचारला.

सर्व प्रेक्षकांच्या नजरा कियाराकडे होत्या की, ती आता काय उत्तर देणार. अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र तेवढ्यात अभिनेता रणवीर सिंग तिच्यासाठी धावून आला. तो तिला खाली बोलावून घेत होता. माईक चालत नाही, बंद आहे असं रणवीर म्हणाला. अखेर तिनं उत्तर दिलं ‘मी अभिनेत्री म्हणूनच ठिक असं कियारा म्हणाली.

कियारा आभार व्यक्त करताना म्हणाली, मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.