
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि गुजरातचे केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांची पत्नी रेश्मा पटेलने बनवला आहे. भरतसिंह सोलंकी यांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप रेश्मा पटेल यांनी केला आहे. याबाबत दोघांमध्ये कायदेशीर लढाईही सुरू आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये कॉंग्रेस नेते भरतसिंह सोलंकी (Bharatsinh Solanki) हे एका तरुणीबरोबर खोलीत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, खोलीचा दरवाजा उघडून सोलंकी यांच्या पत्नी रेशमा सोलंकी अचानक आत आल्या. आपल्या पतीला परक्या बाईसोबत बघून भरतसिंह सोलंकी यांच्या पत्नीने मोठा कहर केला. दरम्यान, हा व्हिडिओ समोर येताच गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Carrying forward the legacy of Chacha Nehru ?????????
Gujarat congress leader #BharatSolankee caught red handed (with the girl half of his age). pic.twitter.com/Zyyl5MHq4r— Adv. Dhaval Nakhva (@dhaval8456) June 1, 2022
त्यानंतर भरतसिंग आणि त्यांच्या पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. इतकंच नाही तर, रेश्मा पटेल यांच्यासोबत काही लोक असून हे लोकही घरात जबरदस्तीने घुसताना दिसत आहेत. त्यानंतर या अनोळखी तरुणीचे केस पकडून रेश्मा या तिला मारझोड करताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा भरत सिंह सोलंकी यांच्या पत्नी रेश्मा पटेल यांनी बनवला आहे. माझ्या पतीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा आरोप रेश्मा पटेल यांनी केला आहे. दरम्यान, भरतसिंग सोलंकी आणि त्यांच्या पत्नी रेश्मा सोलंकी यांच्यात घटस्फोट झाल्याची चर्चा आहे, मात्र त्यांच्या पत्नीने भरत सिंह यांना घटस्फोट देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या