Video: ‘वर्ल्डकप आपला आहे, घरी घेवून ये’, युझवेंद्र चहलने शेअर केलेल्या गाण्यावर पत्नी धनश्रीने केला जबरदस्त डान्स

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे संघाला विश्वचषक खेळायचा आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण यादरम्यान चहलने वर्ल्ड कपचे गाणे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये चहल वर्ल्ड कपसाठी तयारी करताना दिसत आहे. नेटमध्येही तो खूप घाम गाळत आहे. यानंतर ते मैदानात येऊन सर्व सहकाऱ्यांना भेटताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ चहलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘वर्ल्ड कप हमारा है घर लेकर आ’,हे गाण त्या व्हिडिओला आहे. चहलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर आणि लाइक केला जात आहे. यावर भाष्य करताना चाहते विश्वचषकासाठी शुभेच्छाही देत ​​आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

चहलची पत्नी धनश्रीनेही हेच गाणे तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे. पण हा व्हिडिओ वेगळा आहे. बॅकग्राऊंडमध्ये वर्ल्ड कपचे गाणे वाजत आहे, पण व्हिडिओमध्ये धनश्री स्वतः डान्स करताना दिसत आहे. यावेळी धनश्रीने टीम इंडियाची निळी जर्सीही घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

16 ऑक्‍टोबरपासून ऑस्ट्रेलियाच्‍या यजमानपदी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या पात्रता सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला सुपर-12 च्या गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका देखील आहेत.