Women’s Equality Day : महिला समानता दिन का साजरा केला जातो? महिला समानतेचा इतिहास काय आहे? जाणून घ्या

Women’s Equality Day : महिला समानता दिन दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी जगभरात महिलांचे हक्क, समानता आदी विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जातात. पुरुषप्रधान समाजात महिलांच्या समान हक्काची चर्चा कालपर्यंत स्वप्नवत होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, स्त्रिया केवळ त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर पुरुषांच्या बरोबरीने पोहोचल्या नाहीत, तर त्या अनेक क्षेत्रात त्यांना मागे टाकत पुढेही आल्या आहेत. आज, महिला समानता दिनानिमित्त, आपण या दिनाचे महत्त्व, इतिहास जाणून घेऊया.
महिला समानता दिन म्हणजे काय?
एक काळ असा होता जेव्हा जगभरात महिलांना द्वितीय श्रेणीचे नागरिक मानले जात होते. अमेरिका आणि न्यूझीलंडच्या महिलांनी याबाबत आवाज उठवला. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन राज्यघटनेतील 19व्या दुरुस्तीद्वारे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार मिळाला. हळूहळू जगभरातील महिलांमध्ये ही जागृती आली आणि 26 ऑगस्ट हा दिवस जगातील बहुतांश देशांमध्ये महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो.
महिला समानता दिनाचे महत्त्व
26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेत 19व्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना समानतेचा अधिकार देण्यात आला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली होती. 1972 मध्ये पहिल्यांदा महिला समानता दिन साजरा करण्यात आला. परंतु याआधी न्यूझीलंडने 1893 साली जगातील पहिला देश म्हणून महिला समानता दिनाची सुरुवात केली होती.
महिला समानता दिनाचा इतिहास?
1853 साली अमेरिकेत पहिल्यांदा महिलांच्या हक्कांसाठी लढा सुरू झाला, जेव्हा विवाहित महिलांनी त्यांच्या मालमत्तेचा हक्क मागण्यासाठी पुढाकार घेतला. तोपर्यंत केवळ अमेरिकेतच नाही तर बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये महिलांना गुलामांसारखी वागणूक दिली जात होती. हळूहळू महिलांमध्ये त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढली. 1890 मध्ये अमेरिकेतच नॅशनल अमेरिकन वुमन सफ्रेज असोसिएशनचा पाया घातला गेला. महिलांनी चालवलेल्या या संस्थेने महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सर्वप्रथम संपूर्ण अमेरिकेत आंदोलन केले. प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर 1920 साली अमेरिकेत महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. 1971 मध्ये, महिला संघटनांनी संयुक्तपणे 26 ऑगस्ट हा महिला समानता दिन म्हणून साजरा केला. हळूहळू जगातील सर्व देशांमध्ये महिला समानता दिन साजरा करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
या दिवशी अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, भारतासह जगातील सर्व देशांमध्ये महिलांच्या हक्कांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या विषयावर ठिकठिकाणी वादविवाद, परिषदा, स्पर्धा, गेट-टू-गदर आयोजित केले जातात. महिला संघटनेच्या पदाधिकारी सर्वसामान्य महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतात.