
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा आशिया चषकात दोन्ही संघांच्या या टक्करकडे लागल्या आहेत. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराटवर असणार आहेत, ज्याला पाकिस्तानचा संघ घाबरतो. पाकिस्तानी गोलंदाजांना विराटने नेहमीच रडवलं आहे. विराट कोहली जेव्हा-जेव्हा पाकिस्तानसमोर आला तेव्हा त्याने आपल्या बॅटची धमक दाखवली आणि त्याची चमकदार कामगिरी याचा पुरावा आहे. यावेळीही आशिया कपमध्ये विराट कोहली पाकिस्तानसाठी मोठा धोका असेल. याची चार मोठी कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
- विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा टी-20 रेकॉर्ड अप्रतिम आहे. या दिग्गज उजव्या हाताच्या फलंदाजाने पाकिस्तानविरुद्ध 7 सामन्यात 311 धावा केल्या आहेत. विराट कोहलीची फलंदाजीची सरासरी 77.75 आहे. त्याच्या बॅटने पाकिस्तानविरुद्ध तीन टी-20 अर्धशतके झळकावली आहेत.
- आशिया कपबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्धची सरासरी 68 पेक्षा जास्त आहे. विराटने 3 सामन्यात 206 धावा केल्या असून त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले आहे. विराट कोहलीने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी खेळली, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
- विराट कोहलीने एकदिवसीय – टी-20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकूण 2 शतके झळकावली आहेत. यासोबतच त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकेही झळकली आहेत. म्हणजे मर्यादित षटकांच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये, प्रत्येक स्पर्धेत कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आहे.
- ज्या दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना होणार आहे, त्या मैदानावर विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आहे. हे अर्धशतक 2021 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध केले होते. भारताने रोहित-केएल राहुल, सूर्यकुमार यांच्या विकेट लवकर गमावल्या होत्या पण विराट कोहलीने संघाला सांभाळताना 57 धावांची खेळी केली होती.