गटारी अमावस्या का साजरी केली जाते? कधी आहे? जाणून घ्या सर्व

WhatsApp Group

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्व दिले जाते. महाराष्‍ट्रात 29 जुलै पासून श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस अधि गटारी अमावस्या साजरी केली जाते. यावर्षी गटारी अमावस्या 28 जुलै रोजी आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक कठोर नियम पाळले जातात आणि हिंदू लोक या प्रथा परंपरांचे कटाक्षाने पालन करतात. संपूर्ण श्रावण महिन्यात मासाहार करत नाही. श्रावण महिन्यात पूर्णपणे मासाहार बंद करावा लागतो आणि शुद्ध सात्विक शाकाहारी अन्न खावे लागते.

श्रावणात बरेच लोक संपूर्ण महिना उपवास करतात. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो त्यामुळे लोक मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ खाणे टाळतात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते.

श्रावणाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात कारण श्रावण सुरु झाल्यानंतर मास खाणे चुकीचे मानले जाते. कारण पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे लोक हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात. गटारी सणाच्या दिवशी, कुटुंबे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मेजवानीचा आणि पेयांचा आनंद घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात.

श्रावणमध्ये वेगवेगळ्या पूजा, व्रत आणि उपवास केले जातात. गटारीचा अर्थ अमर्यादपणे सेवन करणे असे केले जाते. त्यामुळे तुम्ही गटारी अमावस्येला पोट भरून खाऊ शकता.