Dahi Handi Festival 2022: दहीहंडीचा उत्सव का साजरा केला जातो? काय आहे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Group

Dahi Handi Festival 2022: दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी साजरा केला जाणारा अतिशय प्रसिद्ध सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या निमित्ताने प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि त्यानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.  या उत्सवादरम्यान दहीहंडीने भरलेली हंडी उंचावर ठेवली जाते, जी तोडण्याचा प्रयत्न विविध तरुण मंडळी करतात. हे खेळाच्या स्वरूपात आहे, ज्यासाठी बक्षिसे देखील दिली जातात. दहीहंडी सहसा कोणत्याही वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाते.

दहीहंडी सण का साजरा केला जातो?

भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांचे स्मरण करून आणि आनंदी जीवनाच्या उद्देशाला महत्त्व देऊन दही हंडी सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांना लहानपणापासूनच दही आणि लोणी खूप आवडत होते. ते अनेकदा लोणी आणि तूप चोरून स्वत:च्या घरी किंवा इतरांच्या घरी गुपचूप खात असे. खोडकर नंदलालाच्या या वागण्यामुळे गोकुळातील महिलांनी उंच जागेवर तूप आणि लोणी टांगायला सुरुवात केली, अशा स्थितीत कान्हाचा मोठा भाऊ बलराम आणि त्याचा जवळचा मित्र सुदामा खांद्यावर चढून कृष्ण लोणीच्या मडक्याजवळ पोहोचत होते आणि लोणी खातच होते. येथून दहीहंडीची प्रक्रिया सुरू झाली असे मानले जाते. पूर्वी हा सण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये साजरा केला जात होता पण आता तो देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये साजरा केला जातो.

दहीहंडी उत्सवाचे महत्त्व

गोकुळात दूध दही साठवून ठेवले जात होते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत जाऊन मनोरे बनवायचे आणि मटकी फोडायचे आणि दह्याचा आनंद घ्यायचे. या खोडसाळपणामुळे गोकुळातील रहिवाशी आनंदी होते, कारण ज्यांच्या येथे भगवान श्री कृष्णाने दहीहंडी फोडली. त्याचे संपूर्ण आयुष्य सुखी होऊन गेले आणि त्या घरात सुख-शांतीची कधीच कमतरता राहिली नाही. या समजुतींमुळे दहीहंडी उत्सव साजरा केला गेला. भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांचा आनंद घेतला जातो.