Champions Trophy 2024 : ICC नं चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी दोन ठिकाणं का जाहीर केली? संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घ्या
Champions Trophy 2025 : ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून विजेतेपदाचा सामना 9 मार्चला होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. रोहितची सेना बांगलादेशविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला शानदार सामना रंगणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी दोन ठिकाणे जाहीर केली आहेत. यासोबतच विजेतेपदासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
अंतिम फेरीसाठी दोन ठिकाणं का?
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासह, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे की दुबई या स्पर्धेच्या विजेतेपद सामन्याचे आयोजन करू शकते, परंतु हे एका अटीवर होईल. ती अट म्हणजे भारत फायनलमध्ये पोहोचला पाहिजे. बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता, त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जात आहे.
भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. आता जर रोहितची पलटण विजेतेपदापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली तर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामन्याचे आयोजन केले जाईल. त्याचवेळी, जर टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रवास केवळ ग्रुप स्टेज किंवा सेमीफायनलमध्ये संपला, तर अशा परिस्थितीत अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल.
23 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वात मोठा सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला दुबईत होणार , अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे.