कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर सापडलं

WhatsApp Group

या जगात पहिले अंडे आले की पहिली कोंबडी याचे उत्तर आजपर्यंत कोणाला देता आलेले नाहीये. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. त्यावेळी तुम्हालाही उत्तर देता आले नसेल. मात्र आता याचे उत्तर मिळालं आहे.  ब्रिटिश वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामध्ये हे उत्तर समोर आलेय. त्यांनी केलेल्या अभ्यासातून पहिली कोंबडी आली होती हे उत्तर समोर आलेय.

अंडं आधी की कोंबडी यावर यूकेतील शेफील्ड आणि वारविक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी शोध सुरू केला. अनेक वर्षांच्या शोधानंतर त्यांना या प्रश्नाच उत्तर सापडलं आहे. संशोधनानुसार जगात अंड्याआधी कोंबडी आली होती. हे शास्त्रज्ञ कशावरून सांगत आहेत, याचं देखील स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

शेफील्ड आणि वारविक युनिर्व्हसिटीच्या शास्त्रज्ञांनी हे उत्तर शोधून काढलंय. वैज्ञानिकांच्या शोधात असं समोर आलं की कोंबडीचा जन्म आधी झाला आहे. ओवोक्लोइडिन नावाच्या प्रोटीनमुळे अंड्याचे कवच तयार होते. या प्रोटीनशिवाय अंड्याचे कवच तयार होऊ शकत नाही. असं त्यांचं म्हणण आहे.