
मुंबई : “शाळांमध्ये सरस्वती आणि शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही कधी पाहिलं नाही. ज्यांनी फक्त समाजातील 3 टक्के लोकांनाच शिकवलं. ज्यांनी आम्हाला शिक्षित केलं त्या सावित्रीबाई फुलेंचा फोटो शाळेत लावायला हवा. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आम्हाला घडवलं त्यांचे फोटो लावायला हवेत. आपण कोणाचा फोटो लावतो सरस्वतीचा, शारदा मातेचा जिला आम्ही कधी बघितलं पण नाही जिने आम्हाला काही शिकवलंच नाही. असे वादग्रस्त विधान छगन भुजबळ यांनी केले आहे.
भुजबळांच्या या विधानावर भाजपा नेते राम कदम यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना आमचे देव आणि देवता बाबत एवढी चीड का ? हा खरा सवाल आहे. आज ह्यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात .. उद्या ह्यांना आमची मंदिरेही खटकतील.. उद्या मंदिरे कश्याला पाहिजेत ती ही पाडून टाका म्हणतील हे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना आमचे देव आणि देवता बाबत एवढी चीड का ? हा खरा सवाल आहे.
आज ह्यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात .. उद्या ह्यांना आमची मंदिरेही खटकतील.. उद्या मंदिरे कश्याला पाहिजेत ती ही पाडून टाका म्हणतील हे pic.twitter.com/hXcSt3iU5t
— Ram Kadam (@ramkadam) September 26, 2022
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आयोजित महोत्सवामध्ये उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी भुजबळांनी सरस्वती शारदा मातेवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा