
पुरुष-स्त्री नात्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे शारीरिक आणि लैंगिक जवळीक. मात्र अनेकदा स्त्रिया काही गोष्टी आपल्या पुरुष जोडीदारापासून लपवून ठेवतात, विशेषतः जेव्हा विषय योनीविषयी असतो. हे लपवण्यामागे केवळ संकोच किंवा लाज नाही, तर सामाजिक conditioning, भीती, आत्मविश्वासाचा अभाव आणि काहीवेळा अनुभवांमुळे निर्माण झालेली भीतीसुद्धा असते. आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया ज्या महिलांना आपल्याला सांगायला अवघड वाटतात.
1. योनीतील नैसर्गिक वास
प्रत्येक स्त्रीच्या योनीला एक विशिष्ट वास असतो. तो पूर्णतः नैसर्गिक असतो, पण अनेक स्त्रियांना यामुळे न्यूनगंड वाटतो. पुरुषांना तो वास आवडेल की नाही, याची चिंता त्यांना सतत सतावते. त्यामुळे त्या याबद्दल कधीच खुलेपणाने बोलत नाहीत.
2. ओलसरपणा किंवा कोरडेपणा
योनीतील ओलसरपणा हा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असतो. काही वेळा तणाव, औषधे किंवा हार्मोनल बदलांमुळे योनी कोरडी राहते. पण स्त्रियांना वाटते की, पुरुष याचा चुकीचा अर्थ लावतील, म्हणून त्या हे लपवतात.
3. पूर्वीचे लैंगिक अनुभव
स्त्रीने आधी कोणते लैंगिक संबंध ठेवलेत का, हे जाणून घेण्याची पुरुषांची उत्सुकता असते. पण बहुतेक स्त्रियांना वाटते की, त्यांनी सांगितलं तर त्यांच्यावर शंका घेतली जाईल किंवा त्यांना कमी लेखलं जाईल. म्हणून त्या हे नेहमी दडवतात.
4. लैंगिक इच्छांची खरी भावना
सर्व स्त्रियांना संभोगात काय हवं असतं, ते बोलून दाखवायला भीती वाटते. पुरुष त्यांना चुकीच्या नजरेने पाहतील, असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्या आपल्या खऱ्या लैंगिक गरजा किंवा कल्पना व्यक्त करत नाहीत.
5. योनीशी संबंधित आजार किंवा समस्या
बऱ्याच वेळा महिलांना संसर्ग, जळजळ, खाज किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागतो. पण त्या आपल्या जोडीदाराला याबद्दल सांगत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की, यामुळे पुरुष त्यांना घाणेरडे किंवा अस्वच्छ समजतील.
6. मासिक पाळी आणि त्याचा प्रभाव
मासिक पाळीदरम्यान योनीत होणारे बदल, वेदना किंवा वास याविषयी स्त्रिया सर्रास बोलत नाहीत. त्यांना भीती वाटते की पुरुष याला किळस वाटेल किंवा संभोगाची इच्छा कमी होईल.
7. अस्वस्थता
संभोगानंतर काही स्त्रियांना वेदना, जळजळ किंवा अस्वस्थ वाटू शकते. पण त्या हे मान्य करत नाहीत, कारण पुरुषांना वाटू नये की त्यांचा सेक्स अनुभव वाईट होता किंवा ते काहीतरी चुकीचं करत आहेत.
8. योनीचा आकार किंवा देखावा
स्त्रियांना वाटते की, त्यांची योनी ‘परफेक्ट’ नाही, त्यामुळे त्या आपल्या योनीच्या रंग, देखावा किंवा आकाराबद्दल बोलत नाहीत. समाजाने आणि अश्लील चित्रफितींनी तयार केलेल्या कल्पनांमुळे त्यांना न्यूनगंड होतो.
9. लैंगिक संभोगाची भीती किंवा पूर्वीचा वाईट अनुभव
काही स्त्रियांना संभोगाची भीती वाटते, पण त्या ती खुलेपणाने सांगत नाहीत. कधी कधी त्यामागे बलात्कार, दु:स्वप्न किंवा वाईट अनुभव असू शकतो, पण त्या व्यक्त करण्याऐवजी मनात ठेवतात.
10. ऑर्गॅझमची खरी अनुभूती
खरं सांगायचं झालं, तर अनेक स्त्रिया ऑर्गॅझमचा नाटकीपणा करतात. त्या स्वतःला आनंद मिळत नाही, पण पुरुषाचा अहंकार दुखावला जाऊ नये म्हणून त्या खोटं सांगतात.
स्त्रियांनी आपल्या भावना, शरीरासंबंधी चिंता किंवा लैंगिक समस्या खुलेपणाने मांडाव्यात असं आपल्याला वाटतं. पण त्यांच्यावर लहानपणापासून जे मानसिक बंधनं लादलेली असतात, त्यातून बाहेर पडणं सोपं नाही. पुरुषांनी याचा आदर ठेवत महिलांना सुरक्षित आणि विश्वासाचं वातावरण द्यायला हवं. त्यामुळेच नात्यात खरी जवळीक निर्माण होते आणि दोघांनाही समृद्ध अनुभव मिळतो.