
Janamashtami 2022 : राधा-कृष्ण असेच नाव आपण घेतो कारण ते वेगवेगळे नाहीतच मुळी! श्रीकृष्ण राधेशी व राधा श्रीकृष्णाशी एकरूप झाले आहेत. त्यांची शरीरं वेगवेगळी असली तरी आत्मा एकरूप झाला. आजही एखाद्या जोडप्याचे निस्वार्थ प्रेम पाहिले की त्यांना राधा-कृष्णाची उपमा दिली जाते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का राधा आणि कृष्णाचे लग्न का झाले नाही. जेव्हा राधा आणि कृष्णाच्या प्रेमाविषयी राधाच्या घरच्यांना माहीत झाले तेव्हा त्यांनी राधाचे घरातून बाहेर पडणे बंद केले. कृष्णाच्या बासुरीचा मधुर आवाज जेव्हा राधाच्या कानावर पडत असे तेव्हा ती स्वत:ला कृष्णाला भेटण्यापासून रोखू शकत नसे. यासाठी तिच्या घरच्यांनी तिला पलंगाला बांधून ठेवले. या लेखात आम्ही तुम्हाला संपूर्ण घटना सांगणार आहोत.
राधाला होणारा त्रास पाहून कृष्णाने असे केले की…
पोर्णिमेच्या एका संध्याकाळी राध कृष्णाच्या बासुरीची धून ऐकून बैचेन झाली. तिकडे, कृष्णालाही राधाला होत असलेल्या त्रासाची जाणीव झाली होती. कृष्णाने आपला भाऊ बलरामासोबत राधेच्या घराच्या छतावर आले आणी पलंगाला बांधलेल्या राधेला मुक्सत केले. पोर्णिमाची ही रासलीला अंतिम होती. राधा कृष्णापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. कृष्णाने घरी येऊन आई यशोदाला सांगितले की त्याला राधाशी लग्न करायचे आहे. यशोदाने कृष्णाला समजावले की राधा तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे आणि कंसाच्या सैन्यामधील एका सैनिकाशी राधाचा विवाह ठरला आहे त्यामुळे तु लग्नाचा विचार सोड.
आईच्या समजावण्यानंतरही आई यशोदाने कृष्णाची तक्रार नंदाकडे केली. नंद आपल्या मुलाला घेऊन गर्गाचार्य आणि संदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले. येथे संदीपनी ऋषींनी कृष्णाला समजावताना म्हटले, कृष्ण धरतीवर तुझा जन्म धर्माच्या रक्षणासाठी झाला आहे आणि तुला तुझ्या लक्ष्यावरून दूर गेले नाही पाहिजे.
कृष्णाने दिला लग्नास नकार
गुरूचे सांगणे ऐकूण कृष्णाने विनम्रतेने सांगितले, गुरूदेव माझे मन गाय, पर्वत, जंगल यांच्यातच रमते. मला यांच्यातच रहायचे आहे. कृष्णाच्या तोंडून हे ऐकून गर्गाचार्य यांनी कृष्णाच्या जन्माचे सत्य सांगितले. धर्माची स्थापना करण्यासाठी तुझा जन्म झाल्याचे त्यांनी कृष्णाला सांगितले. यावेळी कृष्णाने लग्न करण्यास नकार दिला.
Dahi Handi Festival 2022: दहीहंडीचा उत्सव का साजरा केला जातो? काय आहे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर