मुख्यमंत्री बरे होईपर्यंत त्यांनी आपली जबाबदारी इतरांकडे का दिली नाही? त्यांचा कोणावरच विश्वास नाही का?- नितेश राणे

WhatsApp Group

मुंबई – अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी उपचारासाठी गेल्यानंतर आपली जवाबदारी 1 तास 25 मिनिटांसाठी अमेरिककेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली होती. यावरून भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी उपचारासाठी गेल्यानंतर आपली सूत्रे काही वेळासाठी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली होती. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आठवड्यापासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर मान दुखीमुळे शस्रक्रिया करण्यात आली आहे. यादरम्यान नितेश राणेंनी ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरेवंर निशाणा साधला आहे. गेले काही दिवस ठाकरे-राणे कुटुंबातील  वाद शांत होता मात्र नितेश राणेंच्या या विधानामुळे या वादाला पुन्हा एकदा हवा मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत होतं ते महाराष्ट्रामध्ये का होत नाही? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे उपचारासाठी गेल्यानंतर त्यांची जवाबदारी 85 मिनिटांसाठी उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली जाते, मग महाराष्ट्रामध्ये असं का होऊ शकत नाही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आठवडाभर रुग्णालयात आहेत. मुख्यमंत्री बरे होईपर्यंत त्यांनी आपली जबाबदारी इतरांकडे का दिली नाही? त्यांचा कोणावरच विश्वास नाहीय का? मी नाही म्हणजे कोणीच नाही असं त्यांनी ठरवलं आहे का? असा सवाल भाजपचे युवा आमदाक नितेश राणे यांनी केला आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघडीतील (Maha Vikas Aghadi) नेतेमंडळी आणि भाजपमधील नेतेमंडळी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे आपण पाहिले आहे. हे पक्ष एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीच. त्यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation ) निवडणूकीवरून एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी सुरू आहे. याचं मुद्द्यावरून आता नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीट करत चिमटा काढला आहे.