सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली? Rhea Chakrabortyचं मोठं विधान, म्हणाली

0
WhatsApp Group

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनुभवांबद्दल खुलेपणाने सांगितले.

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023’ मध्ये राजदीप सरदेसाई यांच्याशी संवाद साधताना रिया चक्रवर्ती म्हणाली- ‘खासगी आयुष्य हे गुपितच राहायला हवं. कोणाला चांगलं वाटेल की कोणी आपल्या खासगी आयुष्यात मध्यस्ती करत असेल…’ प्रत्येकाला खासगी आयुष्य जगण्याचा आधिकार आहे. फक्त तो दहशतवादी नसायला हवा. आपल्याला आपल्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला सांगायचं कोणाला नाही सांगायचं ही आपली बाजू आहे. तुम्हाला कसं वाटेल तुमच्या बेडरुमध्ये कॅमेरा लावला आहे आणि तुम्ही तुमच्या पत्नीसोबत आहात..’ असं देखील ती म्हणाली.

‘माझं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं होतं, जे मला बिलकूल आवडलं नव्हतं. मी कोणालाही मेसेज करेल, ते माझं खासगी आयुष्य आहे…’ आयुष्यात आलेल्या वाईट दिवसांना आठवत रिया म्हणाली, ‘मला संधी मिळाली असती तर, पुरुषप्रधान विचारांना २०२० पूर्वी संपवलं असतं…असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली त्यानंतर रिया चक्रवर्तीवर मृत्यूचे अनेक आरोप करण्यात आले. रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. यामुळे रियाला तुरुंगात जावे लागले आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला जावे लागले.

34 वर्षीय सुशांत सिंग राजपूत हा 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. राजपूतच्या पालकांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर, तिच्याकडून कथित औषध खरेदीचा समांतर तपास सुरू झाला. एनसीबीनेही या प्रकरणाचा तपास केला आणि रिया चक्रवर्तीही तुरुंगात गेली. मात्र, सर्व तपासाअंती सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.