Ashok Chavan: काँग्रेस का सोडली? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिलं ‘हे’ उत्तर

WhatsApp Group

माझ्या जन्मापासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आलो. पक्षानेही मला खूप सारे दिले. पण त्या बदल्यात मीसुद्धा पक्षासाठी बरेचकाही केले. आता मला वाटते मी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? असे विचारले असता, मला भाजपची कार्यप्रणाली माहिती नाही. त्यामुळे तूर्तास तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मी कोणताही विचार केला नाही. मात्र, दोन दिवसांनी मी माझा निर्णय जाहीर करेन, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

काँग्रेसला रामराम का?

प्रसारमाध्यमांनी काँग्रेस सोडण्याचे कारण काय? विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले, विशेष असे कारण नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असावंच लागतं असं नाही. माझ्या जन्मापासून, पाठिमागील अनेक वर्षे मी काँग्रेससाठी काम करत आलो. मात्र, आता मला इतर पर्यायांचा विचार करायला हवा असे वाटले म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. इतर कोणत्याही पक्षात जाण्याविषयी अद्याप तरी निर्णय झाला नसल्याचेही ते म्हणाले.