‘मृत्यूनंतर लहान मुलांचा देह पुरावा (त्याचे खनन करावे) आणि वयोवृद्धांचा (मोठ्या व्यक्तींचा) देह दहन (अग्नीसंस्कार) करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे. लहान मुलांच्या अंत्यसंस्काराविषयीची सूत्रे आणि त्यांविषयीचे शास्त्र पुढे दिले आहे. नामकरणापूर्वी (१२ व्या दिवसापर्यंत) बालकाचा मृत्यू झाल्यास खनन करावे. (देह पुरावा.)
चौलसंस्कार झालेल्या अथवा न झालेल्या ३ वर्षांपर्यंतच्या बालकाचे मृत्यूनंतर दहन किंवा खनन यांपैकी काहीही केलेले चालते. असे असले, तरी २ वर्षे पूर्ण न झालेल्यास मृत्यूनंतर पुरणे जास्त योग्य, तर २ वर्षे पूर्ण झालेल्यास मृत्यूनंतर दहन करणे जास्त योग्य होय. (संदर्भ : धर्मसिंधु, पृष्ठ ६०८ आणि ६०९)
‘स्थूलदेह हा पृथ्वीतत्त्वाशी निगडित असतो. २ वर्षांपूर्वीच्या बालकाचा स्थूलदेह कोवळा असतो. त्यामुळे तो स्थूलदेह (पृथ्वीतत्त्व) मातीत (पृथ्वीतत्त्वात) सहज मिसळू शकतो, म्हणजेच स्थूलदेहाचे पंचतत्त्वात विघटीकरण सहज होते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे स्थूल आणि सूक्ष्म देहांचे जडत्वही वाढत जाते. देह पुरल्यास त्याचे पंचतत्त्वात विघटीकरण होणे कठीण असते. मृत्यूनंतर स्थूलदेह दहन केल्याने त्याची राख होते. ही राख मातीत सहज मिसळते, म्हणजेच स्थूलदेहाचे पंचतत्त्वात विघटीकरण सहज होते. Why are dead Hindu children buried instead of cremated