MH BOARD 12TH RESULT: बारावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी; कोणाचा किती टक्के लागला निकाल; इथे बघा

WhatsApp Group

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

95.24 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

  • या परीक्षेत राज्यातील 5001 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे.

कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; यंदाही मुलींची बाजी

मार्च- एप्रिल 2022 विषयनिहाय निकाल

  • विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकालन लागला आहे.
  • कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे.
  • वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे.