Harsha Richhariya: मॉडेल ते सर्वात सुंदर साध्वी, सोशल मीडियावर चर्चेत असणारी ‘हर्षा रिछारिया’ नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या
Harsha Richhariya: जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. या मेळाव्याला नागा साधू मोठ्या प्रमाणात प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर उत्तराखंडची मॉडेल असलेली हर्षा रिछारिया सध्या आहे, हर्षा रिछारिया साध्वी बनलेली आहे.
यादरम्यान हर्षा रिछारियाचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हयरल होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मॉडेल आणि साध्वी या दोन्ही गोष्टींमुळे सध्या महाकुंभाची जोरदार चर्चा सुरु आहे. महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी साध्वी हर्षा रिछारिया रथावर आरूढ होत पोहोचली होती. हर्षा रिछारियाचे गुरु आचार्य महामंडळेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरीजी महाराज आहेत.
ते निरंजनी आखाड्यातून येतात. यावेळी तिने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ घातली होती. हर्षा रिछारिया प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी ठरलेली आहे. तसेच दोन महिन्यात हर्षा रिछारिया साध्वी कशी बनली असा प्रश्न देखील सोशल मीडियावर तिला विचारला जात आहे. हर्षा साध्वी होण्यापूर्वी एक अँकर होती त्याचसोबत ती सोशल इन्फ्लूएन्सर देखील होती.
तिला सोशल मीडियावर साध्वी हर्षा असा टॅग दिला गेला ज्यावर हर्षा म्हणाली होती, साध्वी होणं ही एक फार मोठी गोष्ट आहे… मला लोक सर्वात सुंदर साध्वी म्हणतात त्याबद्दल मी त्यांनी आभारी आहे, पण मी साध्वी नाही, मला अजून माझ्या गुरुंकडून दीक्षा मिळालेली नाही.. मी सनातन धर्माकडे आता कुढे वळत आहे. मी फक्त एक मंत्र दीक्षा घेतलेली आहे. अशा प्रकारची दीक्षा कोणीही घेऊ शकतं, असं हर्षा म्हणाली आहे.