Health Tips: पांढरा कांदा की लाल कांदा कोणता जास्त फायदेशीर; जाणून घ्या दोन्हीतील फरक

WhatsApp Group

White Onion And Red Onion Difference : कांदा बहुतेक सर्व स्वयंपाकघरात वापरला जातो. लोक जेवणात लाल कांदा जास्त वापरतात. पांढऱ्या कांद्याचा वापर सामान्यतः डिशेस बनवण्यासाठी केला जात नाही, पण पांढऱ्या कांद्याचे फायदे हे जास्त आहेत. पांढऱ्या कांद्याची चव एकदम वेगळी असते. तुम्ही ते कच्चे किंवा शिजवलेले खाऊ शकता. पांढरा कांदा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीराला फायदा होतो.

अलीकडेच शेफ संजीव कपुरे यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी कांद्याचे फायदे सांगितले. ते म्हणाले होते, तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात वापरण्यात येणारा कांदा तुम्हाला सन स्ट्रोक आणि सनबर्नपासून वाचवतो. कांद्यामध्ये “शरीराला थंडावा देणारे, भरपूर फायबर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, हृदय निरोगी ठेवणारे, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म, भरपूर अँटीऑक्सिडंट्स” असे घटक आढळतात.

पांढरा आणि लाल कांदा यातील फरक

लाल कांदा आणि पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक गोष्टी सारख्या असल्या तरी त्या दोघांमध्ये अनेक भिन्न गुणधर्म आढळतात जे त्यांना वेगळे करतात. पांढऱ्या कांद्यामध्ये लाल कांद्यापेक्षा जास्त अँटीबायोटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पांढऱ्या कांद्यामध्ये लाल कांद्यापेक्षा जास्त कॅलरी आणि कमी फायबर असते. पांढऱ्या कांद्यात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण कमी असते.