India vs South Africa: सामना सुरु असताना मैदानात घुसला विषारी साप, स्टेडियममध्ये पसरली होती घबराट; पहा व्हिडिओ

WhatsApp Group

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे खेळवला गेला. भारताने प्रथम फलंदाजी करत 238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉकने नाबाद 69 धावांची खेळी केली. त्याचवेळी मिलरने 106 धावांचे शानदार शतक झळकावले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि भारतीय संघाने हा सामना 16 धावांनी जिंकला. मात्र या सामन्या दरम्यान एक गम्मत घडली. राहुलचं लक्ष अचानक मैदानात आलेल्या सापाकडे गेलं, ज्यानंतर काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता. क्रिकेटच्या मैदानावर कुत्रे, मांजर, मधमाशांमुळे सामना थांबल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल, पण थेट सामन्यादरम्यान मैदानावर विषारी साप आल्याने सामना पहिल्यांदाच थांबला असावा.

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान अचानक एक विषारी साप मैदानात घुसला. त्यामुळे सामना काही काळ थांबला होता. ही संपूर्ण घटना सामन्याच्या 8 व्या षटकात घडली, आठवे षटक सुरू होणार असतानाच सर्व खेळाडू थांबले. त्याचवेळी एक मोठा साप मैदानात फिरताना दिसला. ज्याला सुरक्षा रक्षकांनी यशस्वीपणे पकडले. या घटनेत सर्व खेळाडू आणि प्रेक्षक सुखरूप असून कुणालाही इजा झालेली नाही हीही दिलासादायक बाब होती.

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 9.5 षटकांत 96 धावा जोडल्या. रोहित शर्माने 37 चेंडूत 43 धावा केल्या, तर केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले.

हे दोघे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 5 चौकार मारले. याशिवाय विराट कोहलीने 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला 237 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि 221 धावा करून 16 धावांनी सामना गमावला.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा