दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद

WhatsApp Group

जम्मू -काश्मीर – पूंछ जिल्ह्यात दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ‘ज्युनियर कमिशंड ऑफिसर’सह (जेसीओ) लष्कराचे 4 जवान सोमवारी शहीद झाले. या प्रकरणी संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरनकोटच्या डेरा की गली गावात पहाटेच्या सुमारास ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.

लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याने एक जेसीओ आणि इतर चार जवान जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्रांसह नियंत्रण रेषा ओलांडली असून चार्मेरच्या जंगलात लपल्याची माहिती मिळाली होती. अतिरेक्यांचे बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करता यावेत यासाठी अतिरिक्त फौज घटनास्थळी पाठवण्यात आली होती. या हल्ल्यात 4 ते 5 दहशतवादी सामील असण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांची घुसकोरी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दहशतवादी घटनांमुळे घाटीत दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच गुरुवारी ईदगाह, श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी दोन सरकारी शाळेच्या शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांची ओळख सुपिंदर कौर (प्राचार्य) अलोची बाग परिसरातील आणि दीपक चंद (जम्मू ­- काश्मीर) मधील रहिवाशी आहे. ते संगमच्या शासकीय मुलांच्या शाळेत शिक्षक होते.

या महिन्याच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी औषध विक्रेता मखनलाल बिंद्रू यांची गोळ्या घालून हत्या केली. माखन हा काश्मिरी पंडित होता आणि दहशतवाद्यांनी त्याला अनेक वेळा काश्मीर सोडण्याची धमकी दिली होती. पण दहशतवाद्यांच्या धमकीनंतरही बिंद्रूने काश्मीर सोडलं नाही. या रागाच्या भरात दहशतवाद्यांनी त्याच्या दुकानाबाहेर त्याला गोळ्या घातल्या. बिंद्रूच्या हत्येच्या एका तासाच्या आत दहशतवाद्यांनी बांदीपोराच्या शाहगुंड गावात टॅक्सी असोसिएशनचे मालक मोहम्मद शफी लोन यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.