IND vs AUS: U19 World Cup 2024 Final सामना कुठे पाहता येणार?

0
WhatsApp Group

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघ पुन्हा अंतिम सामन्यात आमने-सामने आले आहेत. अंडर 19च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये भिडत होणार आहे. भारताने यापूर्वी U19 चा वर्ल्डकप हा पाचवेळा जिंकलाय. आता रेकॉर्ड ब्रेक सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याची संधी उदय सहारणच्या नेतृत्वाखालील संघाला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हाय व्होल्ट्रेज सामना भारतीय वेळेनुसार उद्या रविवारी दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. सामना कधी कुठे पाहता येणार, असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत. भारत -ऑस्ट्रेलिया हा हाय व्होल्टेज फायनल सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्डकप 2024 ची फायनल ही स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित होईल. भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना हा हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या (Australia )अखेरच्या गडीने पाकिस्तानच्या (Pakistan) स्वप्नांवर पाणी फेरलं. 180 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी झाली होती. परंतु अखेरच्या गडीने पाकिस्तानला पराभूत केलं.

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 2012 स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकअखेर 225 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार उन्मुक्त चंदने शतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.U19 World Cup 2024 Final