PM Kisan Yojana: पुढचा हप्ता कधी येणार, पती-पत्नी दोघांनाही मिळणार 2 हजार रुपये? वाचा..

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम देते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये पाठवले जातात.
भारत सरकारच्या या योजनेचा लाभ 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दिला जात आहे. सध्या या योजनेचे 11 हप्ते शासनाने पाठवले आहेत. शेतकरी आता बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबरच्या कोणत्याही तारखेला पाठवण्यात येईल.
पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार?
पीएम किसान योजनेबाबत अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ एकाच वेळी मिळू शकतो का? तर याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नियमांनुसार, पीएम किसान योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीलाच दिला जातो. जर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य या योजनेचा लाभ घेत असेल तर इतर सदस्य या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. म्हणजेच पती किंवा पत्नीमध्ये एकाच व्यक्तीला दोन हजार रुपये मिळू शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये अवैध लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकार आता अशा लोकांवर कडक कारवाई करत आहे. सरकारने या लोकांना नोटीस पाठवून पंतप्रधान किसान योजनेचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास अशा लोकांवर कारवाई केली जाईल.