6G कधी लाँच होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं उत्तर, पहा व्हिडीओ

WhatsApp Group

भारतात आता 5G सेवा ग्राहकांना लवकरच मिळणार आहे. जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता चर्चा आहे ती 6G ची, कारण त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं विधान केलं आहे.

भारत 6G लाँच करण्यासाठी तयारी करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते एका व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान 6G वर बोलत होते. गेमिंग आणि मनोरंजनासाठी इंडियन सोल्युशनला प्रोत्साहन देत आहोत. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की 5G सेवा ही स्वस्त आणि सुलभ उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे.

आता जिओ आणि एअरटेल कंपन्या 5G चे दर कसे ठरवतात आणि सेवा ग्राहकांना कधी देतात याकडे लक्ष आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत प्रमुख 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल असा अंदाज आहे. त्यानंतर 6G सेवा देखील सुरू करण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारतात 2030 पर्यंत ग्राहकांना 6G सेवेसाठी प्रतिक्षा करावी लागू शकते.

टेलिकॉम कंपन्यांनीही त्यांच्या ग्राहकांना 5G सेवा सुरू करण्याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, अदानी डेटा नेटवर्क आणि व्होडाफोन आयडिया नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात 5G सेवांसाठी सर्वाधिक बोली लावली आहे.