IPL 2025 चा मेगा लिलाव कधी आणि कुठे होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असल्याचं दिसत आहे. वास्तविक, IPL 2025 च्या मेगा लिलावाची संभाव्य तारीख आणि ठिकाण यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, आयपीएल 2025 चा मेगा लिलाव नोव्हेंबरच्या अखेरीस रियाधमध्ये होऊ शकतो. या मेगा लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी त्यांच्या संबंधित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मेगा लिलावापूर्वी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचा लिलाव रियाधमध्ये होणार असून, 24 ते 25 नोव्हेंबर या तारखा असण्याची शक्यता आहे. मेगा लिलावापूर्वी अनेक मोठे खेळाडूही जाहीर झाले आहेत, ज्यात जोस बटलर, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल आणि ऋषभ पंत यांची नावे आहेत. सर्व फ्रँचायझी या खेळाडूंवर मोठी रक्कम खर्च करण्याच्या तयारीत असतील.
आयपीएल 2025 मध्ये 5 संघ नवीन कर्णधाराचा शोध घेतील. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या नावांचा समावेश आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावामध्ये 46 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले असून त्यात 36 भारतीय आणि 10 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यावर 558.5 कोटी इतका मोठा खर्च करण्यात आला आहे. हेन्रिक क्लासेन आणि विराट कोहली सर्वाधिक रकमेसह कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत टॉप-2 मध्ये आहेत. क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 23 कोटींमध्ये तर विराट कोहलीला 21 कोटी रुपयांमध्ये आरसीबीने कायम ठेवले आहे.
फ्रेंचायझीने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी:
चेन्नई सुपर किंग्ज: रुतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल
गुजरात टायटन्स: राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान
कोलकाता नाइट रायडर्स: रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग
लखनौ सुपर जायंट्स: निकोलस पुरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी
मुंबई इंडियन्स : जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा
पंजाब किंग्स : शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, संदीप शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल
सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड.