भारतात 18 लाखांहून जास्त अकाउंट्स बॅन, ‘या’ चुका पडल्या महागात

WhatsApp Group

WhatsApp चा वापर करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. कंपनीने यासंबंधी नुकतीच माहिती दिली आहे. भारतात 18 लाखांहून जास्त अकाउंट्सला मार्च महिन्यामध्ये बॅन करण्यात आले आहे. ही माहिती देताना कंपनीने सांगितले की, नवीन IT Rules 2021 अंतर्गत या अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे.

मार्च मध्ये 597 तक्रारी मिळाल्या होत्या ज्यात 74 अकाउंट्स विरोधामध्ये कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती व्हॉट्स ॲपकडून देण्यात आली आहे. भारतात एकाचवेळी 18 लाखांहून जास्त अकाउंट बॅन करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या चुका करण्यापासून दूर राहा

  1. ॲपचा यूज स्पॅमसाठी करू नका. याचा थेट अर्थ म्हणजे मेसेज पाठवण्यासाठी ब्रॉडकास्टिंग लिस्ट किंवा ग्रुप बनवा.
  2. व्हॉट्स ॲपवर फेक न्यूज पसरवल्यास अकाउंट बॅन होऊ शकते.
  3. मालवेयर किंवा वायरसची एपीके फाइल किंवा असेच धोकादायक लिंक एकदुसऱ्याला फॉरवर्ड करू नका. ते तुम्हाला महागात पडू शकते.
  4. जर तुम्ही अन्य कोणासाठी अकाउंट बनवले किंवा तुम्ही अन्य कुणाचे नावाने अकाउंट चालवत असाल तर तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते.
  5. WhatsApp Delta, GBWhatsApp आणि WhatsApp Plus सारखे थर्ड पार्टीचे व्हॉट्सॲप ॲपचा वापर नेहमीसाठी अकाउंट बॅन केले जावू शकते.
  6. जर खूप सारे लोक एखाद्या अकाउंटचा रिपोर्ट करीत असेल तर त्यांच्या विरोधात तक्रार करीत असतील तर ते अकाउंट बॅन केले जावू शकते.
  7. यूजर्संना अवैध, अश्लिल, मानहानी, धमकी देणारे, धमकावणारे, समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर, किंवा पोर्न क्लिप शेअर करणे, असे अकाउंटवर होत असेल तर ते अकाउंट बॅन केले जावू शकते.