
GST: महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक झटका बसणार आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या किचनचं बजेट कोलमडणार आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूचें दर देखील आणखी वाढणार आहेत. नुकतीत जीएसटी काउंसिल (GST Council) ची 47 वी बैठक झाली.काही वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर आधी जीएसटी (GST) लागू नव्हता. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयांमुळे येत्या 18 जुलैपासून काही वस्तू महागणार आहेत.
मनीकंट्रोलच्या रिपोर्ट्सनुसार,जीएसटी काउंसिलच्या बैठकीनंतर 29 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महसूल सचिव तरुण बजाज यांनी 18 जुलैपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या 18 जुलैपासून टेट्रा पॅक असलेले दही, लस्सी आदी खाद्यपदार्थ महागणार आहेत.
काय महागणार
- टेट्रा पॅक असलेले दही, लस्सी आणि बटर
- चेक बुकसाठी आकारण्यात येणाऱ्या शुक्लात वाढ
- हॉस्पिटलमध्ये 5000 रुपयांपेक्षा (विना-आयसीयू) जास्त भाडे असलेल्या खोलीच्या प्रतिदिन शुक्लावर 5 टक्के जास्त जीएसटी द्यावा लागेल.
- एटलससह सर्व प्रकारच्या मॅप आणि शुल्कावर 12 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल.
- हॉटेलमध्ये प्रति दिन 1000 रुपयांहून कमी भाडे असलेल्या खोलीसाठी 12 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल.
- एलईडी लाइट्स, एलईडी लॅम्प
- ब्लेड, पेपर कात्री, पेंसिल शार्पनर, चमचा, काटा चमचा